व्यक्तित्वाचा विकास

व्यक्तित्वाचा विकास

तुमच्या या अद्भुत अस्तित्वाचा शोध घ्या

तुम्ही पाहिले असेल की एका खोलीत एक छोटे बाळ आले की, त्याच्या केवळ अस्तित्वाने तेथील सर्वजण त्याच्याकडे आकर्षले जातात. त्या बाळाला सगळ्यांना आकर्षित करायला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. ते नैसर्गिकरित्या होवून जाते. आपण शब्दांपेक्षा आपल्या अस्तित्वाने (उपस्थितीने) अधिक प्रभावी संवाद साधू शकतो. पण आपण जसे मोठे होवू तसे आपल्या आयुष्याच्या ह्या उदा-त पैलूकडे दुर्लक्ष करतो. आपले अस्तित्व दुबळे होत जाते कारण आपल्या मनात भूतकाळातील अनुभवांचे अगणित ठसे उमटलेले असतात.

आपल्या जीवनात तीच निरागसता , मैत्रीभाव आणि स्वाभाविकता कशी काय परत मिळवता येईल?
हे  शक्य आहे केवळ एका साध्या सरळ, पण प्रभावशाली श्वसन-क्रीयेमुळे, जिचे नाव सुदर्शन क्रिया. या प्रक्रीयेमुळे आपल्या अस्तित्वाच्या विविध स्तर म्हणजेच शरीरापासून ते सूक्ष्मतम सतरांपर्यंततणाव आणि भूतकाळातील अनुभवाचे ठसे बुजवले जातात आणि आपले अस्तित्व सुंदर होऊ लागते.

तुम्हाला किती लवकर यशस्वी व्हायचे आहे?

सर्वांना जीवनात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी म्हणजे काय फक्त बँकेत पैसे असणे किंवा चैनीचे जीवन जगणे? एखाद्याकडे खूप पैसा आहे, पण तो जर सारखा आजाराने पिडीत असेल, तर तो आयुष्य आनंदात घालवू शकत नाही. कित्येकदा असे झाले आहे की माणसं आपला अर्धं आयुष्य पैसे कमवायला घालवतात आणि उरलेलं अर्धं आयुष्य त्याच पैश्याने आरोग्य परत मिळविण्यात घालवतात. काय याला म्हणायचा यश?

अशा एका अवस्थेची कल्पना करा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अडचणींना / समस्यांना हसत हसत सामोरे जाण्यासाठी बळ मिळते आणि त्या समस्यांना / अडचणींना तुम्ही एका नव्या संधीमध्ये परिवर्तन करू शकता. तुम्हाला नाही वाटत, का हे एका यशस्वी माणसाचे लक्षण आहे? आर्ट ऑफ लिव्हिंग हॉर्स मध्ये शिकविली जाणारी तंत्र तुम्हाला हेच मिळवून देतात.

जेवढ्या लवकर तुम्ही स्वत:ला योग, प्राणायाम आणि ध्यान याची सवय लावून घ्याल, तेवढ्याच गतीने तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक बाजूने तुम्ही यशस्वी होताल.

स्वतःचं  एक न डळमळणारे व्यक्तिमत्व निर्माण करा.

ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास करण्यासाठीचे पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत, पण व्यातीगत तेज, मित्रत्वाची भावना इत्यादी गुण तुम्हाला पुस्तके देउ शकणार नाही.  आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये प्राणायाम आणि ध्यान यासारखी प्राचीन तंत्रे शिकविले जातात ज्यामुळे तुमच्यात चैतन्य, अंतर्ज्ञान, कल्पनाशक्ती, उत्साह, बुद्धीमत्ता यांचे उत्थान होते आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक अध्यात्मिक तेज या गुणांचा विकसित होतो.

तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही हवे आहे ते मिळविण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि कार्यक्षमता मिळते आणि चेहऱ्यावर कधीही न लोपणारे स्मित. याच्यामुळे तुमच्याकडे पहाणाऱ्या लोकांना तुमच्यासारखे होण्याची प्रेरणा मिळते.

share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *