२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस

२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस

मी सौ गीता संभाजीराव खोचरे ( मुख्याध्यपिका – आदर्श विद्या मंदिर , इचलकरंजी )

जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)यां चा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो

मातृभाषा म्हणजे मुलांची व्यक्त होण्याची भाषा. आपल्या भाषेतून सर्व प्रकारचा विकास होतो . मनाला उभारी देण्याचे काम आपली स्व : भाषेचं करते. भावनिक सामाजिक विकासास चालना मिळते. इतिहासाचा वीरपणा,गणिताचा नेमकेपणा , विज्ञानांची वैज्ञानिक  निष्ठता , कलेचा आस्वाद मातृभाषेतून सहज शक्य आहे.

याचे मूर्तीवंत उदाहरण म्हणजे माझी मुलगी कु. प्रणाली खोचरे, जिचे बालवाडी ते चौथी शिक्षण – आदर्श विद्या मंदीर व पाचवी ते दहावीचे शिक्षण व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी येथे मराठी माध्यमातून झाले. या तिच्या शैक्षणिक कारकिर्दीत तिने कोणतेच क्षेत्र सोडले नाही. स्पर्धापरीक्षा, नृत्य , क्रीडा,नाट्य या सर्वामध्ये जवळ जवळ जिल्हास्थर निश्चित होता. शिष्यवृत्ती ५ वी ७ वी , गणित प्रज्ञाशोध , इतिहास प्रज्ञाशोध , संस्कृत कथाकथन , वक्तृत्व , निबंध , १०वी बोर्डात २५ वी असे भरघोस यश मिळवले.  तिच्यातील आत्मविश्वास मातृभाषेमुळे  घडला . आज ती एम पी स सी मधून महाराष्ट्रात मुलींच्यात प्रथम येऊन डेप्युटी सीईओ पदावर  विराजमान झाली आहे , हे सर्व मातृभाषेच्या शिक्षणामुळेच.तसेच आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी प्रितम अलुगडे जो वेबसाईट डेव्हलपर ज्याने हि शाळेची वेबसाईट बनवली आहे, असे अनेक उद्धरणे आहेत जे आदर्श विद्या मंदिर मध्ये शिकून अनेक मोठं मोठ्या हुद्यावर काम करत आहेत.

मराठी असण्याची खरी किंमत समजायची असेल तर माणसाने प्रथम महाराष्ट्राबाहेर पडावं! याचा अर्थ असा नाही की बाहेर सर्वत्र दलदल आहे आणि महाराष्ट्रच काय तो एक हिऱ्या-मोत्यांनी भरलेला आहे. पण बाहेरच्या जगाविषयी आपल्या बऱ्याचदा भुरळ पडणाऱ्या, फसव्या, मायावी कल्पना झालेल्या असतात. पर्यायाने आपण आपल्याजवळ जे आहे त्याला कमी लेखू लागतो, त्याची उपेक्षा करू लागतो. एकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला म्हणजे मग आपले भ्रम दूर होतात. ज्या गोष्टींच्या शोधात आपण इथवर आलो, त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याजवळ मुळातच होत्या हे समजत – फक्त त्या अघोषित होत्या इतकंच. मराठीत वाक्यात बळेबळेच इंग्रजी शब्द कोंबतो, बिन तिखट-मसाल्याचा पिझ्झा कोक बरोबर गळ्याखाली ढकलतो, मोठ्या हॉटेल मध्ये गेला कि उगीचच वेटर शी हिंदीत मध्ये बोलतो ( वास्तविक वेटर पण मराठीच असतो पण दोघे हिंदीत बोलतात).  आणि मग याचीच दुसरी बाजू आपलं दुखरेपण घेऊन समोर येते – “मराठी भाषा जगवायला हवी…”, “मराठी भाषेचा अभिमान बाळगा

मराठीपण म्हणजे सामाजिक बांधिलकी – या सामाजिक बांधिलकी मुळे महाराष्ट्रात तळागाळात काम करणाऱ्या व्रतस्थ सुधारकांची/समाजसेवकांची जगाला हेवा वाटावी अशी परंपरा निर्माण झाली आहे. पूर्वी च्या काळी हि ज्ञानेश्वर-तुकाराम आदी संतांची परंपरा होती, जी पुढे विनोबा भावे, गाडगेबाबा, बहिणाबाई, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांनी समाजसुधारणेच्या माध्यमातून पुढे नेली. हे सगळे NGO वगैरे प्रकार सुरु व्हायच्या कित्येक आधीपासून! आणि आज त्याच परंपरेतून अण्णा हजारे, डॉ विकास आमटे, कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी लोकसेवक पुढे आले.

मराठीपण म्हणजे हे सगळं असण आणि यापेक्षा बरंच काही असण… ते किल्यांची पदभ्रमंती करण्यात आहे, पंढरीची वारी करण्यात आहे, शिवजयंतीला शिवज्योत घेऊन दौडत जाण्यात आहे आणि नवीन वर्षाच्या पहाटे अक्कलकोट ला जाऊन केलेल्या “श्री स्वामी समर्थ ” च्या गजरात आहे. हे मराठीपण एका रात्रीत घडलं नाही, शतकानुशतके वाहणाऱ्या प्रवाहाने खडकांना आकार द्यावेत तशी या संस्कृतीने मराठी मनाची जडणघडण केली आहे – ती बदलणे वरकरणी वाटलं तरी सोपं नाही. हे मराठीपण फ़क़्त मराठी बोलण्यापुरते नाही आहे, उलट मराठी भाषा हे ते मराठीपण व्यक्त करण्याचं साधन आहे. म्हणून जोपर्यंत मराठीपण आहे, तोपर्यंत मराठी भाषा राहणारच!

 

share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *